इतिहासाचा टेलिग्राम ग्रुप
(Add ur friends)
https://t.me/historysamadhanmahajan
@SRMAHAJAN
Recent Posts
अमिताभ संपला नाही. कारण, तो थांबला नाही. तो साचला नाही. "आमच्यावेळी असं होतं!", असं माणसं दिवसातला निम्मा वेळ म्हणू लागली की ती संपतात. आपली मुलं-बाळं रांकेला लागली की आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाली, असं जे मानतात, ते अकाली म्हातारे होतात! सकाळी वॉक, दुपारी एक पोळी, रात्री ग्लासभर दूध आणि गोळी एवढंच ज्यांचं आयुष्य होऊन जातं, ते त्या शेड्यूलचे गुलाम होतात. तेही ८० वर्षे फीट जगतात, पण केंव्हाच संपून गेलेले असतात.
अमिताभ संपला नाही. कारण, त्याच्या त्या 'ॲंगी यंग मॅन' रूपाप्रमाणेच तो सदैव कार्यरत राहिला. अपघात, आजारपणं, दुखणी त्याच्यामागे कमी नाहीत. कौटुंबिक ताण, पोराबाळांची चिंता नाही, असं नाही. उद्योगधंद्याचं तर पार दिवाळं निघालं. राजकारणात अपयशी ठरला. तरी तो उभा राहिला. धावत राहिला. अमिताभ हा अभिनेता वा माणूस म्हणून थोर असेलच, असे माझे मत अजिबात नाही. पण, हे जे आहे ते का आहे? काय आहे? ते नाकारून कसे चालेल? अमिताभचा जादुई आवाज, अमिताभचा करिष्मा, कवीचा मुलगा असलेल्या अमिताभची साहित्याची समज, त्याचा आवाका, त्याची खोली, त्याची तीक्ष्ण विनोदबुद्धी हे कसं नाकारणार? रूढ अर्थानं अमिताभकडं ना चेहरा, ना ॲक्शन हीरोची शरीरसंपदा. पण, अमिताभ हा अमिताभच असतो. त्याचे डोळे, त्याचे नाक, त्याचा चेहरा, त्याची उंची, त्यांचे शरीर असं सुटं सुटं करून चालत नाही. या सगळ्याचा म्हणून जो एकत्रित परिणाम आहे, तो अभूतपूर्व आहे. तो अमिताभ आहे!
परवा लॉ कॉलेज रस्त्यावरच्या बरिस्तात कॉफी पित होतो. पलिकडच्या टेबलवर एक वयोवृद्ध जोडपं बसलं होतं. तर, दुस-या टेबलवर काही तरूण मुलं-मुली बसली होती. म्हातारा-म्हातारी पेन्शनपासून टेन्शन आणि मुलीच्या लग्नापासून ते फॉरेन टूरपर्यंत बरंच बोलत होते. तिकडं पोरं एक्झामपासून ते आयपीएलपर्यंत ब-याच गप्पा ठोकत होते. दोन्ही टेबलवरून दोन नावं मात्र सारखी ऐकू येत होती - अमिताभ बच्चन आणि शरद पवार. हे म्हातारे कॉलेजात होते, तेव्हा शरद पवार आमदार झाले, तर अमिताभच्या 'आनंद'नं लक्ष वेधून घेतलं. किती उन्हाळे-पावसाळे पाहिले, पण हे दोघं आहेतच. पवारांचा पक्ष फुटेल. अमिताभचा सिनेमा पडेल. पण, ते आहेत.
"सध्या काय करताय?" असं विचारल्यावर पवार परवा एका मुलाखतीत म्हणाले होते- "सेल्फी काढायला शिकतोय!"
हेच ते कारण आहे, ज्यामुळं माणसं ऐंशीव्या वर्षीही 'रिलिव्हंट' असतात. बाकी, तुम्हालाही नसतील, अशा व्याधी, अशी आजारपणं, अशा समस्या, असे ताण, असे प्रश्न त्यांच्या वाट्याला आहेत. पण, 'ॲंग्री यंग मॅन'ला डोक्यावर घेणा-यांची नातवंडं कॉलेजात जाऊ लागली, तरीही हा 'यंग मॅन' अमिताभ आहेच. आणि, पवार ३८व्या वर्षी मुख्यमंत्री झाले, तेव्हा पवारांविषयी बोलणा-यांना आज त्यांची नातवंडं शरद पवारांची जादू सांगू लागली आहेत!
हे दोन्ही 'बच्चन' आजही व्यावसायिक शिस्तीने आणि उत्साहाने कार्यरत आहेत, पण ते दोघेच नाहीत. तिकडे ८६ व्या वर्षी आमचे भालचंद्र नेमाडे नव्या प्रकल्पावर अहोरात्र काम करताहेत. त्यांच्या लिहिण्याने नव्या मुलांना आजही झपाटून टाकताहेत. त्याच वयाचे रतन टाटाही पहाटे पाचला उठून दिवस सुरू करताहेत.
शुभ्रा गुप्ता म्हणते ते खरंय.
अमिताभच्या घरावर एकच नेमप्लेट आहे -
"Work in Progress!"
अमिताभला 'हॅपी बड्डे' म्हणणं म्हणजे अखंड, अविरत, अव्याहत अशा कार्यमग्नतेचं सेलेब्रेशन आहे! अमिताभ एका रात्रीत जन्माला येत नाही. तो अव्याहत कामातून, कार्यमग्नतेतून, अविचल निष्ठेतून 'अमिताभ' होत असतो.
हे 'अमिताभ'पण लक्षात घ्यायला हवं.
(फक्त माहिती म्हणून सांगतो - अमिताभ हे महायान पंथातल्या बुद्धांचे एक नाव आहे.)
अविरत चालणं हा अमिताभचा 'पासवर्ड' आहे.
सो, चालत राहा.
मुक्काम आणि मोक्षाच्या आशा करू नका.
पडद्यावर धावणारा अमिताभ आठवा आणि तसेच पॅशनेटली धावत राहा. चालत राहा. अविरत कार्यरत राहा.
तुम्हीही बच्चन व्हाल!
माझी गॅरंटी.
- संजय आवटे

'हम'ने पुन्हा अमिताभची जादू अधोरेखित केलीही. पण 'गंगा जमना सरस्वती', 'तूफान', 'जादूगर', 'इन्सानियत' या सिनेमांनी अमिताभच्या चाहत्यांना देखील हसावे की रडावे, ते कळत नव्हते!
अमिताभ संपला होता. राजेश खन्ना संपला, तसा अमिताभही संपणार होताच.
तो काळ आणखी वेगळा होता. सगळीकडे प्रस्थापितांना आव्हान दिले जात होते. १९८४ ला पाशवी बहुमत मिळवणा-या कॉंग्रेसला आता आघाडी करून सत्ता टिकवावी लागत होती. छोटे छोटे प्रादेशिक पक्ष रिंगणात उतरत होते. जागतिकीकरणाने दरवाजे उघडले होते. सोव्हिएत रशिया कोसळत होती. इंटरनेटने जग जोडणे आरंभले होते. घरोघरी छोटा पडदा आलेला होता. रेशनच्या बाहेर उभ्या असणा-या अमिताभभक्तांची मुलं मॉलमध्ये जाऊ लागली होती. माफियांच्या रंगमहालात ट्रिंग ट्रिंग वाजणा-या अवजड फोनची जागा मोबाइल घेऊ लागला होता. सरकारी कचे-यांपेक्षा चकचकीत कॉर्पोरेट कंपन्या खुणावत होत्या. 'जीना हो तो आपुन के जैसे ही जीना', असं म्हणत बॅंक बॅलन्स से रंगीन जगण्याची स्वप्नं ऊर्मिला मातोंडकर दाखवू लागली होती. जुनं संपू लागलं होतं, हे नक्की. पण, नवं नक्की काय येतंय, हे कळत नव्हतं. या गोंधळात अमिताभनं काही वर्षं काढली. तो या काळाचा स्टार नव्हता. त्याचा काळ संपलेला होता. त्याच्या मित्राच्या - राजीव गांधींच्या आग्रहानं तो राजकारणात आला. त्याच्यालेखी हीच 'सेकंड इनिंग' असावी. लोकसभा निवडणूक जिंकून, हेमवतीनंदन बहुगुणांना हरवून अमिताभ खासदारही झाला. पण, ते काही त्याला झेपलं नाही. पुन्हा तो पडद्याकडंच वळला. एकविसावं शतक आलं होतं. अमिताभ साठीचा होत होता. त्याच्यासाठी हा निवृत्तीचा काळ होता.
आणि, मग ते घडलं.
शर्टाला गाठ मारलेला अमिताभ एकदम ब्लेझर घालून अवतरला. व्यवस्थित केस. स्टायलिश चष्मा. देखणी-सुसंस्कृत आणि तरीही तरूणाईचा डौल असणारी खेळकर भाषा. सुटाबुटात अमिताभ घरात आला. मोठा पडदाही ज्याला छोटा पडत असे, असा 'लार्जर दॅन लाइफ' अमिताभ छोट्या पडद्यावर आला. 'कौन बनेगा करोडपती' सुरू झालं आणि अमिताभनं सगळ्यांना खिळवून ठेवलं. कपड्यांची तमा न बाळगता, वेड्यासारखा धावणारा, एका फाइटमध्ये खलनायकांना लोळवू शकणारा, हा ॲक्शन हीरो एका जागी खुर्चीत बसून खेळवू लागला आणि खिळवू लागला. लोक म्हणाले, ही कमाल अमिताभची नाही. 'करोड'ची आहे. पण, तसाच खेळ खेळण्याचा प्रयत्न प्लेबॉय सलमानपासून ते 'ॲक्टर' अनुपम खेरपर्यंत इतरांनीही करून बघितला. मग कळलं, ही गंमत कोणाची आहे!
मग अमिताभ गप्प बसलाच नाही. 'अक्स', 'कभी खुशी, कभी गम', 'बागबान', 'ब्लॅक', 'चिनीकम', 'बंटी और बबली', 'पिंक', 'परिणिता', 'पा', 'शमिताभ', 'गुलाबो सिताबो', 'झुंड' अशी किती नावं घ्यावीत, अगदी ताज्या 'गुडबाय'पर्यंत. पण, अमिताभ काही 'गुडबाय' म्हणायला तयार नाही. 'आनंद', 'जंजीर', 'नमकहराम', 'दीवार', शोले', कभी कभी', 'अभिमान' 'अमर अकबर ॲंथनी', 'डॉन', 'मुकद्दर का सिकंदर', 'नसीब', 'सिलसिला', 'शक्ती' 'अंधा कानून', 'कुली', 'मर्द', 'शराबी' असे एकेक भन्नाट सिनेमे तेव्हा देणारा अमिताभ आजही तेवढ्याच ताकदीने नवनवे सिनेमे घेऊन येतो आहे. आजोबा आणि नातू दोघेही अमिताभचे फॅन आहेत. बाकी, 'जनरेशन गॅप' कितीही मोठी असली तरी अमिताभ आवडण्याविषयी त्यांच्यात एकमत आहे.
काय जादू आहे ही?
सत्तरच्या दशकात आम्ही जन्मलो. तेव्हा आमच्या वडिलांच्या पिढीचा हीरो अमिताभ होता. आमच्या कॉलेज कॅंटिनमध्येही अमिताभ होता. आणि, आताच्या 'जनरेशन झेड'च्या स्टारबक्समध्येही अमिताभ येतो. ओटीटीही अमिताभ व्यापून टाकतो.
आज ११ ऑक्टोबरला अमिताभ ८२ वर्षांचा होतोय. म्हणजे साधारण माझ्या वडिलांच्या वयाचा अमिताभ. तरी त्याला 'अहो-जाहो' करणं अशक्य आहे. जग एवढं बदललं. नेहरू गेले. मोदी आले. साधी थिएटर गेली. मल्टिप्लेक्स आली. आता तर सिनेमा मोबाइलवर आला. टांगेवाला 'मर्द' गेला आणि ओलासह उबेरही आली. कारखाना मालक आणि कामगार यांच्यातल्या 'नमक'चा संदर्भ बदलला. तरीही अमिताभ नावाचा 'सिलसिला' सुरूच आहे. या चमत्कारानं आपलंच डोकं जड होतं. तरी, नवरत्न तेलानं मसाज करायला हा आहेच हजर!
आज ऐंशीव्या वर्षीही अमिताभ पहाटे पाचला उठून सकाळी आठला सेटवर हजर असतो. आजही दिग्दर्शकांच्या सूचनांबरहुकुम अभ्यासपूर्वक काम करत असतो. अमिताभचे समकालीन काळाच्या पडद्याआड गेले. जे आहेत, ते उपकारापुरते उरले. पण, अमिताभ आहेच. कोण्या पन्नाशीतल्या बाल्कीला अमिताभसाठीच 'चिनीकम' करावा वाटतो वा 'पा'मध्ये अमिताभला लहान मूल करावे वाटते. 'मी भूमिकेसाठी अमिताभची निवड नाही केली, तर अमिताभसाठी भूमिका निवडली', असं बाल्की सांगतो. चाळीशीतल्या नागराज मंजुळेला, ऐंशी वर्षांच्या अमिताभनं आपल्या सिनेमात काम नाही केलं, तर आपल्याला 'मोक्ष' मिळणार नाही, असं वाटतं. शूजित सरकारला अमिताभ हवा असतो आणि करण जोहरलाही. अमिताभ सुपरस्टार झाला, तेव्हा ज्या मुली जन्मल्याही नव्हत्या, त्या आता अमिताभच्या नायिका म्हणून पडद्यावर येताहेत.
काय आहे हे?

'बच्चन' व्हायचंय का तुम्हाला?
'नेहरूंनंतर कोण' हा प्रश्न अद्याप सुटलेला नव्हता. लालबहादूर शास्त्री यांच्या अकाली जाण्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या ख-या, पण त्यांना अद्याप देशाने आणि त्यांच्या पक्षानेही पूर्णपणे स्वीकारलेले नव्हते. जयप्रकाश नारायण यांच्यापासून ते जॉर्ज फर्नांडिसांपर्यंत नवे-जुने विरोधी नेते प्रभावी होते. मात्र, देशाला 'हीरो' हवा होता. तो काही सापडत नव्हता.
नेहरूंनी नियतीशी करार केल्यानंतर स्वप्नाचा अथक पाठलाग सुरू झाला. स्वप्नं खूप आली, पण वास्तव त्याहून भयंकर होते. त्यातून निराशाही जन्माला येत होती. इंग्रज गेले आणि आपले राज्य आले, असे वाटत असतानाच, नव्या काळ्या साहेबांनी आपले रंग दाखवायला सुरूवात केली होती. मंत्रालयांची जागा कंत्राटदारांनी व्यापून टाकली होती. बिल्डर आणि कारखानदारांनी लोकशाही ताब्यात घेतल्यासारखी स्थिती होती. माफिया आणि नेत्यांचे नेक्ससही होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे, राजकीय लोकशाही आली होती. प्रत्येकाला एकच मत होते आणि त्या मताचे मूल्यही सारखे होते. पण, सामाजिक विषमतेमुळे लोकशाहीलाच सुरूंग लागत होता.
स्वप्नभंगाचा वाटावा, असा हा काळ होता. लोकांना घाई होती आणि सरकारी वेग फारच कमी होता. लालफितीतल्या भ्रष्ट नोकरशाहीबद्दल संताप सर्वदूर होता. हे चित्र सगळीकडे होते. तिकडे शेजारच्या पाकिस्तानात तर देशाचेच दोन तुकडे होऊ लागले होते. भारतात विरोधक इंदिरा गांधींना संपवू पाहात होते. तिकडे अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निक्सन विरोधकांवर पाळत ठेवत असल्याचे पुरावे मिळत होते. पाकिस्तान दुभंगत होते. व्हिएतनाममध्ये युद्ध सुरू होते. अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यात चांगलीच जुंपलेली होती. एकूण सगळीकडे स्फोटक वातावरण होते. लोक आतून धुमसत होते, मात्र काही करू शकत नव्हते.
पण, त्याचे पडसाद उमटत होते. स.का. पाटलांचा पराभव करून जॉर्ज फर्नांडिस निवडून आले होते. शरद पवार प्रथमच विधानसभेत पोहोचत होते. दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखालील गिरणी कामगारांचा तो भयंकर मोठा संप नंतरचा, पण एकूणच कामगारांचे लढे सुरू झाले होते. त्याचवेळी, 'लुंगी हटाओ' म्हणत शिवसेनेने मुंबईत कम्युनिस्टांपुढे आक्रमक आव्हान उभे केले होते.
हा नेपथ्यरचना होती, जेव्हा अमिताभ बच्चन नावाचा अभिनेता पडद्यावर आला.
'सात हिंदुस्थानी'मधून अमिताभ पहिल्यांदा दिसला, तेव्हा त्याची फार दखल घेतली गेली नसेल. पुढे हाच माणूस अवघी हिंदी सिनेमासृष्टी व्यापून टाकणार आहे, याचा अंदाजही आला नसेल. पण तसे घडले मात्र! १९६९मध्ये कॉंग्रेस पक्ष स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच फुटत होता. इंदिरा गांधी आपले सर्व काही पणाला लावून मांड बसवत होत्या. त्याचवेळी अमिताभ बच्चन नावाचा तारा तळपू लागला होता.
प्रचंड समस्यांच्या गर्तेत असणारा देश हीरोच्या शोधात होता. नेहरूंनंतर असा हीरो मिळत नव्हता. अशावेळी अमिताभ बच्चन सुपरस्टार होत होता. 'जगह बहुत कम है, मुसाफिर ज्यादा', अशा त्या काळात स्वतःची जागा शोधण्यासाठी लोक थिएटरमध्ये जागा मिळवत होते. ब्लॅकने चाललेल्या या दुनियेला धडा शिकवण्यासाठी ब्लॅकने तिकीट काढून अमिताभ नावाचा चमत्कार पडद्यावर अनुभवत होते. तो जे काही बोलत होता, ती त्यांची भाषा होती. त्याचा संताप अवघ्या माणसांचा उद्रेक होता. जन्माला आल्यानंतरचे देशाचे भाबडेपण संपले होते. सत्तरचे दशक सुरू होताना, दोन वर्षात पंधरा हिट सिनेमे देणारा राजेश खन्ना हा देशाचा स्वप्नाळू, निरागस असा प्रेमळ चेहरा होता. मात्र, १९४७ला जन्माला आलेला देश तरूण होत गेला. आणि, त्याचा भाबडेपणा जाऊन त्याची जागा स्वप्नभंगाने घेतली. संतापाने घेतली. अशावेळी ॲंग्री यंग देशाला 'ॲंग्री यंग मॅन' मिळाला. व्यवस्थेला जाब विचारणारा 'हीरो' मिळाला.
थिएटरच्या बाहेर लोक रांगा लावू लागले. अमिताभ पडद्यावर धावू लागला की पैसे उधळू लागले. अमिताभसारखीच शर्टाला गाठ मारून पोरं डायलॉगबाजी करू लागली. अमिताभसारखी हेअरस्टाइल करू लागली. 'बच्चन' नावाचा शब्द भयंकर मोठा झाला. 'बोलबच्चन'पासून ते 'अय, बच्चन'पर्यंत सगळं भावविश्व बच्चननं व्यापून टाकलं. 'नाही रे' वर्गातल्या पोरांनाही बच्चननं दिमाख दिला. या बच्चनप्रेमींना जात नव्हती. धर्म नव्हता आणि प्रांतही नव्हता. अमर, अकबर वा ॲंथनी, कोणीही असो, ते फक्त बच्चनचे फॅन होते. 'फॅन' हा शब्द किरकोळ वाटावा आणि 'भक्त' हा शब्द अगदी कर्मकांडाप्रमाणे भासावा, असे काहीतरी वेगळेच होते, त्यांचे आणि बच्चनचे जैव नाते!
आम्ही कॉलेजात गेलो, तेव्हा बच्चन उतरणीला लागला होता. तरीही, काका, दादा आणि त्यांच्या मित्रांच्या बच्चनप्रेमामुळे आम्हीही बच्चनचे सिनेमे थिएटरात जाऊन बघत होतो. एकेक सिनेमा निराश करत होता. 'आखरी रास्ता' हाच खरे तर अमिताभचा अखेरचा रस्ता ठरायचा, पण त्यानं तो रस्ता लांबवत नेला. 'शहेनशहा', 'खुदागवाह' तसे लोकांना आवडलेही. 'मैं आझाद हूं', 'अग्निपथ'मधून अमिताभ दिसलाही.

फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल, बिन्नी बन्सल, Oyo Roomsचा रितेश अग्रवाल, ओला कॅबचे संस्थापक भाविश अग्रवाल, अंकित भाटी हे अतिशय तरुण entrepreneur आहेत. यांचे आताचे वयही चाळीसच्या आतले आहे. बिजनेस सुरू केला तेव्हा पंचवीस-तीस-बत्तीशीत होते. पण त्यांनी भलेमोठे बिजनेस सुरू केले. स्वतःचे Start Up उभे केले. फार कमी वयात millionaire-billionaire झाले.
यांच्यासारख्या start Ups कडे पाहून-आदर्श घेऊन-स्वप्ने घेऊन अनेक start ups आली अन त्यातली कित्येक गेलीही. यांचे बाण लागले, हे प्रचंड यशस्वी झाले. पण यांच्या प्रेरणेतून आलेले लाखो start ups कधी आले-गेले कळलेही नाही.
यांना फार कमी वयात अमाप यश मिळाले, असेच यश आपल्यालाही मिळेल, ह्या विश्वासापायी उतरलेल्या अनेकांना अपयश आले. अगदी आपल्या परिसरातही असे भारावलेले तरुण व्यवसाय सुरू करताना दिसले असतील.
वर उल्लेख केलेले बिजनेसेस आभाळाला खेटलेले आहेत, त्यामुळे यांच्यासारखीच स्वप्ने पाहायची सवय तरुणाईला लागली. मोठ्या महत्त्वाकांक्षा घेऊन उतरलेले तरुण काहीच वर्षात व्यवसायात डबघाईला आलेले आहेत. मोठी स्वप्ने पाहण्यासाठी केवळ मेंदू, मनच लागत नाहीत, तर उत्तम कल्पना, अनुकूल वेळ, योगायोग, संसाधनं, सरकारी नियम-धोरणं, लोकेशन, व्यवसायाचे ज्ञान, त्याचे Execution, Patience (धीर) लागलात.
ह्या गोष्टी जुळून आल्या तर माणसाच्या यशस्वी होण्याच्या शक्यता वाढतात.
वर उल्लेख केलेल्या काही गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात, काही गोष्टी बाह्यघटकांवर अवलंबून असतात. साऱ्या गोष्टी जुळून येतीलच असे नाही. त्यात Patience बाबत म्हणाल तर सारा मनाचा आणि खिशाचा खेळ आहे. बाहेरून खंबीर, कणखर, कॉन्फिडेंट वाटणारी माणसं कधी कोणत्या प्रसंगाला हतबल होतील, सांगू शकत नाही, त्यांचे अवसान कधी गळून पडेल याचा अंदाज नाही.
अशा गोष्टी आहेत, स्वप्नं पाहताना सारासार विचार व्हावा, सारेच शाहरुख बनू शकत नाहीत, अनेकदा दीपक तिजोरी, आदित्य पंचोलीवर समाधान मानले पाहिजे. शाहरुख बनण्याच्या नादात लाखो तरुण मुंबईत येऊन संपून जातात, निकामी होतात, म्हणून साऱ्या बाजूंनी विचार व्हावा.
मोठी स्वप्नं पाहताना कुठे थांबायचे, आपली क्षमता किती आहे, कुठे पोचल्यावर समाधानी राहत मार्गक्रमण करायचे, हेही कळायला हवे, हे कळले की बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. आपल्या ताकदीचा जराही विचार न करता मोठी स्वप्ने पाहणे म्हणजे वास्तवाचे आकलन न करता स्वतःलाच गैरसमजात ठेवण्यासारखे आहे. माणूस स्वतःच्या क्षमतांच्या मर्यादांचा अभ्यास करत नाही, कारण त्याच्यात आपण कशात कमी आहोत, हे स्वीकारायचे धाडसच नसते. त्यामुळे वास्तवाकडे मात्र डोळेझाक होते.
क्षमता नसताना मोठी स्वप्ने पाहण्याने आणि त्याचा अवलंब करण्यासाठी जीवतोड मेहनत केल्याने माणूस अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांना निमंत्रण मात्र देतो.
झटक्यात-काही वर्षांत काहीही होत नसते, प्रगती होत नसते. ह्या गुजराती-मारवाडी-सिंधी लोकांना मोठे व्हायला अनेक पिढ्या खर्ची घालाव्या लागल्या, तेव्हा कुठे ते आता व्यवसायात स्थिर, समृद्ध, संसाधनांनी मालामाल आहेत.
तरी
Room for error ठेवणे फार महत्त्वाचे. आपण कधीही ढेपाळू शकतो, हे आधीच स्वीकारले की ढेपाळलो तरी मनाला फार लागत नाही. आणि सावरायला, निस्तरायला, नवे काही उभारायला सोपे जाते, डोळ्यांखाली काळी वर्तुळं येण्यापेक्षा हे कधीही श्रेयस्कर!
- निलेश अभंग, कल्याण.

बालीश असला तरी तुम्ही आणखी एक प्रश्न अर्थातच मला विचारणार. जर देव अस्तित्वात नाही तर त्याच्यावर विश्वास ठेवण्यास लोकांनी सुरुवात तरी कशी केली ? याला माझे स्पष्ट आणि थोडक्यात उत्तर असे आहे. जसा ते भूतपिशाच्चांवर विश्वास ठेवायला लागले तसेच हेसुद्धा झाले. फरक इतकाच की ईश्वरावरची श्रद्धा ही सर्वसामान्य पातळीवरची असते आणि त्यासंबंधीचे तत्त्वज्ञानही चांगले प्रगत आहे. लोकांना आपले गुलाम ठेवण्यासाठी पिळणूक करणारे धूर्त लोकांना सर्वश्रेष्ठ परमेश्वराच्या अस्तित्वाची शिकवण देतात आणि मग आपल्या विशेष अधिकारयुक्त स्थानाला त्यांच्याकडून पावित्र्य व मान्यता प्राप्त करून घेतात आणि यातच धर्माचा उगम आहे असे काही जहालमतवाद्यांचे मत आहे. पण ते मला मान्य नाही; जरी सर्व श्रद्धा, धर्म, पंथ आणि इतर अशा संस्था यापुढे जुलमी व पिळणूक करणार्या संस्था, व्यक्ती व वर्ग यांना पाठिंबा देणार्या बनल्या आहेत या जहालांच्या मुद्द्याशी मी सहमत आहे. राजाविरुद्ध बंड करणे हे प्रत्येक धर्माचे पापच मानले आहे.
देवाचा उगम कसा झाला याबद्दल माझी स्वतःची अशी कल्पना आहे की, माणसाच्या मर्यादा, दुबळेपणा, त्रुटी यांची झालेली जाणीव विचारात घेऊन सर्व परिस्थितींना धैर्याने तोंड देण्यासाठी, सर्व प्रकारच्या संकटांना खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी, भरभराटीच्या व समृद्धीच्या काळात माणसाला आवर घालून त्याच्या वागण्यावर ताबा ठेवण्यासाठी देवाचे काल्पनिक अस्तित्व निर्माण करण्यात आले. स्वतःचे खास असे नियम व आईबापांची उदार सहृदयता या दोहोंनी परिपूर्ण अशा देवाची कल्पना जास्त तपशीलवारपणे पुढे रंगवली गेली. माणूस समाजाला विघातक ठरू नये यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून देवाचा उपयोग व्हावा या हेतूने दैवी कोप व दैवी नियम या कल्पना मांडल्या गेल्या. देवाची दयाळू व वात्सल्यवृत्ती वर्णिल्याने तो पिता, माता, भगिनी, बंधू, मित्र, मदतनीस अशा रूपात उपयोगी पडू लागला. विश्वासघात झाल्यामुळे किंवा सर्व आप्तस्वकीयांनी दूर केल्यामुळे मनुष्य जेव्हा अत्यंत निराश अवस्थेत असेल तेव्हा आपल्या मदतीला व आधार द्यायला आपला एक सच्चा आप्त अजूनही आहे आणि तो विधाता आहे, सर्वशक्तिमान आहे या कल्पनेमध्ये त्याला आधार मिळतो. आणि आदिमानवाच्या काळात ही गोष्ट खरोखरच उपयोगी होती. नैराश्यामध्ये ईश्वराच्या संकल्पनेचे फार साहाय्य होते.
माणूस कितीही संकटात सापडला तरी त्या सर्वांचा समर्थपणे मुकाबला करण्याचा पुरुषार्थ दाखवायला हवा. माझी अवस्था नेमकी अशीच आहे. मित्रांनो, हा माझा पोकळ दिमाख नव्हे. नास्तिक बनवणार्या या माझ्या विचारपद्धतीमुळे मी नास्तिक बनलो आहे. अशा माणसाच्या दृष्टीने पाहिले तर दैनंदिन पूजा व ईश्वरावरची श्रद्धा या सर्वात स्वार्थी आणि स्वतःला काळिमा फासणार्या गोष्टी आहेत असे मी मानतो. शेवटपर्यंत म्हणजे अगदी वधस्तंभापर्यंत ताठ मान ठेवून ठाम उभे राहणार्या माणसासारखे वागण्याचा मी प्रयत्न करतो आहे.
मी हे दिव्य कसे काय पार पडतो ते पाहू या. माझ्या एका मित्राने मला प्रार्थना करायला सांगितलं. मी जेव्हा माझ्या नास्तिकतेविषयी त्याला सांगितले तेव्हा तो म्हणाला, ‘‘तुझ्या अखेरच्या दिवसात तू देवावर विश्वास ठेवू लागशील.‘‘ मी म्हणालो, ‘‘नाही. महाशय, असे कधीच होणार नाही. असे करणे म्हणजे तोंडाला काळिमा फासणारे आणि मनोधैर्य खचणारे कृत्य आहे असे मी समजेन. स्वार्थी हेतूंसाठी मी प्रार्थना करणार नाही.‘‘ वाचक आणि मित्र हो, याला तुम्ही पोकळ ऐट म्हणाल काय ? अर्थात ती आहे असे जरी म्हणालात, तर मला अभिमानच आहे.
--- वीर भगत सिंह
जन्म: सप्टेंबर २८ १९०७
विलय: मार्च २३ १९३१
Rahul Bansode कृत अनुवाद

‘मी नास्तिक का आहे?'
सर्वशक्तिमान, सर्वव्यापी आणि सर्वज्ञ अशा ईश्वराचे अस्तित्व मी केवळ माझ्या बढाईखोरपणामुळे नाकारतो आहे का, या प्रश्नाला तोंड द्यावे लागेल अशी मला कधीही कल्पना नव्हती. पण काही मित्रांशी बोलताना माझ्या असे लक्षात आले की, माझा जो काही थोडासा सहवास त्यांना मिळाला त्यावरून त्यांनी जवळपास असा निष्कर्ष काढला आहे की, माझा देवावरचा अविश्वास हा जरा अतिरेकीपणाच आहे आणि माझ्या नास्तिक असण्यामागे बराचसा उथळपणा व दिखावेगिरी एवढीच कारणे आहेत. पोकळ ऐट हा माझ्या स्वभावाचा एक भाग निश्चितच आहे. माझ्या सहकार्यांत मी ‘एकाधिकारशहा‘ म्हणूनच ओळखला जात होतो. माझे स्नेही बटुकेश्वर दत्त हेसुद्धा कधी कधी मला तसे म्हणत. ऐट किंवा अगदी काटेकोरपणे सांगायचे झाले तर ‘अहंकार‘ हा स्वतःबद्दलच्या गैरवाजवी अभिमानाचा अतिरेक असतो. या गैरवाजवी अभिमानामुळे मी नास्तिकतेकडे वळलो आहे की या विषयाचा काळजीपूर्वक अभ्यास व बरेचसे चिंतन केल्यानंतर मी देवावरच्या अश्रद्धेपर्यंत आलो आहे. या प्रश्नाची मी इथे चर्चा करू इच्छितो. सर्वप्रथम मला हे स्पष्ट करावेसे वाटते की अहंमन्यता आणि पोकळ ऐट या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
या माझ्या सर्व मित्रांच्या म्हणण्यानुसार दिल्ली बॉम्ब प्रकरण व लाहोर कट या खटल्यांच्या सुनावणीच्या वेळी मला मिळालेल्या अवाजावी प्रसिद्धीमुळे कदाचित मी गर्विष्ठ झालो आहे. त्यांचे म्हणणे बरोबर आहे का ते आपण पाहू या. माझ्या नास्तिकतेचा उगम इतक्या अलीकडचा नाही. माझ्या या वरील मित्रांना ज्याच्या अस्तित्वाची जाणीवही नव्हती असा एक अप्रसिद्ध तरुण जेव्हा मी होतो तेव्हापासून मी देवावर विश्वास ठेवणे थांबविले होते. नास्तिकतेकडे वळवू शकेल असा कोणताही स्वतःबद्दलचा गैरवाजवी अभिमान निदान महाविद्यालयातल्या एका विद्यार्थ्यात निर्माण होण्याचे काहीच कारण नव्हते. काही प्रोफेसरांचा मी आवडता आणि इतरांचा नावडता होतो, तरीही मी कधी अभ्यासू किंवा चमकणरा मुलगा नव्हतो. ज्याला ऐट म्हणतात, अशा प्रकारची भावना निर्माण होण्याची संधी मला कधीच मिळाली नाही. किंबहुना ज्याच्यात पुढील व्यवहारातल्या आयुष्यक्रमाबाबत एक प्रकारचा निराशावाद होता अशा शामळू व बुजर्या वृत्तीचा मी मुलगा होतो आणि त्या काळात मी संपूर्णपणे नास्तिक नव्हतो. ज्यांच्या देखरेखीखाली मी वाढलो ते माझे आजोबा कर्मठ आर्यसमाजी होते. आर्यसमाजी हा बाकी काहीही असो, पण तो नास्तिक नसतो. माझे प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर मी लाहोरच्या डी. ए. व्ही. शाळेत गेलो आणि एक वर्ष मी तेथल्या वसतिगृहात राहिलो. तेथे सकाळ-संध्याकाळच्या प्रार्थनेव्यतिरिक्त मी तासन् तास गायत्री मंत्र पठण करत असे. त्या काळात मी पूर्णपणे श्रद्धाळू होतो. नंतर मी माझ्या वडिलांबरोबर राहू लागलो. कर्मठ धर्ममताच्या बाबतीत पाहिले तर ते उदारमतवादी आहेत. स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचण्याची स्फूर्ती मला त्यांच्या शिकवणीतूनच मिळाली. पण ते नास्तिक नाहीत. ते कट्टर आस्तिक आहेत. रोज प्रार्थना म्हणण्यास ते मला प्रोत्साहन देत असत. अशा प्रकारे मी लहानाचा मोठा झालो.
१९२७ च्या मेमध्ये मला लाहोर येथे अटक झाली. दुसर्या दिवशी मला रेल्वे पोलीस कोठडीत नेण्यात आले. इथे मला सबंध महिन्याचा काळ कंठायचा होता. त्याच दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी नियमितपणे दोन वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळवू लागले. मी तर नास्तिक होतो. फक्त स्वास्थ्य व आनंदाच्या काळातच मी नास्तिक असल्याची बढाई मारू शकतो की अशा कठीण प्रसंगीदेखील मी माझ्या तत्त्वांना चिकटून राहू शकतो याची माझ्यापुरती तरी मला कसोटी घ्यावयाची होती. बर्याच विचारांती मी निर्णय घेतला की, देवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे हे माझ्याकडून होणार नाही, नाही ते कधीही शक्य नाही. ती खरी कसोटीची वेळ होती आणि त्यातून मी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलो. काही गोष्टींच्या बदल्यात स्वतःची मान वाचवण्याची इच्छा मी कोणत्याच क्षणी केली नाही. म्हणजे मी कट्टर नास्तिक होतो आणि आजपर्यंत नास्तिकच राहिलो आहे. त्या कसोटीला उतरणे ही काही साधी गोष्ट नव्हती. श्रद्धा संकटांची व कष्टांची तीव्रता कमी करते. किंबहुना या गोष्टी सुखावहसुद्धा करते. देवावरच्या विश्वासात माणसाला सांत्वन व आधार मिळतो. त्याच्याशिवाय माणसाला स्वतःवरच अवलंबून राहावे लागते. वादळ आणि तुफानांमध्ये फक्त स्वतःच्या पायावर उभे राहणे हा काही पोरखेळ नव्हे. अशा कसोटीच्या क्षणी गर्व, जर असेलच तर, पार वितळून जातो आणि माणूस इतर सर्वसाधारण माणसांच्या श्रद्धांना बेदरकारपणे धुत्कारू शकत नाही. आणि जर त्याने असे केलेच तर आपण असाच निष्कर्ष काढायला पाहिजे की, त्याच्याकडे केवळ पोकळ डौल नव्हे तर याहून दुसरी अशी काही शक्ती असली पाहिजे. सध्याची माझी स्थिती ही नेमकी अशीच आहे. मी माझ्या ध्येयासाठी माझ्या प्राणांचा त्याग करत आहे, याखेरीज दुसरे कोणते सांत्वन माझ्याकरता असू शकते?

गढीवरून...
प्यार की अजीब दास्ता!
आज मी अशा प्रेमकहाणी बद्दल लिहीणार आहे जी काळाच्या ओघात लुप्त पावलीय किंवा लपवली गेलीय. ही कहाणी आहे पं. जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांची.
*
कैरो या शहरात एक कब्रस्तान आहे. जेथे एकमेव भारतीयाची कबर आहे. या शहराला city of death म्हणून ओळखले जाते. ही कबर आहे सय्यद हुसेन यांची. सय्यद यांचा जन्म 1888 मध्ये ढाका येथे झाला. अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीत पदवी घेतल्यानंतर ते बॅरिस्टर होण्यासाठी लंडन येथे गेले व तेथे सात वर्ष राहिले. पण 1916 भारतात परतले ते पत्रकार म्हणूनच. त्यांना उंची राहण्याचा षौक होता व नेहमीच अतिशय टापटीप कपड्यात असत.
सैय्यद हे दिसायला अतिशय आकर्षक, विद्वान व सुसंस्कृत गृहस्थ होते. त्यांच्या वक्तृत्वाने लोक संमोहित होत. ते अतिशय उत्कृष्ट लेखक व प्रखर देशभक्त होते. परंतु ते भारताच्या इतिहासात नेहमीच दुर्लक्षित राहिले कारण त्यांना देशातील एका प्रतिष्ठित परिवाराची नाराजी सहन करावी लागली.
भारतात 1916 मध्ये परतल्यानंतर ते Bombay chronicle चे उपसंपादक बनले व त्यातून त्यांनी ब्रिटिश सरकारवर चौफेर हल्ले चढवले. त्यांची विद्वत्ता बघून मोतीलाल नेहरू यांनी त्यांना अलाहाबाद येथे बोलावले व ' इंडिपेंडंट ' या पत्राचे संपादक बनवले. त्याकाळी त्यांना महिना रु. 1500 इतका पगार होता. ते आनंद भवन येथेच राहात. या दरम्यानच त्यांचा व मोतीलाल नेहरू यांच्या कन्या विजयालक्ष्मी ( नॅनी) यांचा परिचय झाला व ते एकमेकांच्या प्रेमात पडले. विजयालक्ष्मी या 19 वर्षांच्या होत्या तर सय्यद हे त्यांच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठे होते. दरम्यान, सय्यद यांना खिलाफत चळवळीच्या संदर्भात लंडन येथे जावे लागले. त्याअगोदरच त्यांनी मुस्लिम धर्माप्रमाणे गुपचूप निकाह उरकून घेतला. या घटनेने नेहरू कुटुंबात प्रचंड खळबळ माजली. मोतीलाल व जवाहरलाल दोघेही नॅनीवर प्रचंड नाराज झाले. या गोष्टीची कबुली विजयालक्ष्मी यांनी आपले चरित्र, " The scope of Happiness " मध्ये दिलीय.
पाकिस्तानी पत्रकार H. M. Abbassi यांनी 17 नोव्हेंबर 1971 रोजी डेली न्युज या वर्तमानपत्रात एक लेख लिहिलाय... Love life of Mrs Pandit. या लेखात त्यांनी या विवाहाचे वर्णन केलेय. याचा ओझरता उल्लेख मथाई यांनी त्यांचे पुस्तक The Reminiscences of the Nehru Age या पुस्तकात देखील आहे की नेहरूंनी मला यासंबंधी कागदपत्रे जाळण्यास सांगितली. ( अर्थात या पुस्तकात बर्याच खोट्या गोष्टीही आहेत. )
अखेर 18 डिसेंबर 1919 ला सैय्यद यांनी इंडिपेंडंट या पत्राचा राजीनामा दिला व काँग्रेस अधिवेशनासाठी अमृतसर येथे गेले. तेथेच म. गांधी व मोतीलाल यांनी त्यांना हे विवाहबंधन तोडण्यास राजी केले. या दोन दिग्गज नेत्यांपुढे सय्यद शरण गेले. सय्यद हे लंडनला निघून गेले व बापू हे विजयालक्ष्मी यांना घेऊन साबरमती येथे गेले.
कालांतराने विजयालक्ष्मी यांचा विवाह महाराष्ट्रीयन रणजित पंडित यांच्यासोबत ठरवण्यात आला व नऊ मे 1921 ला हा विवाह पार पडला.
1920 ला भारत सोडल्यावर पुढील 26 वर्ष सय्यद भारतात परतलेच नाहीत. इंग्लंड व अमेरिकेत राहून ते स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय राहीले. 1945 मध्ये विजयालक्ष्मी या अमेरिकेत गेल्या, त्यावेळी त्यांनी आपल्या या जुन्या प्रेमीची भेट घेतली होती.
1946 मध्ये सय्यद यांनी नेहरूंना पत्र लिहून भारतात परतण्याची ईच्छा व्यक्त केली. परंतु नेहरूंनी सय्यद यांना थंड प्रतिसाद दिला. तुम्ही अमेरिकेत राहूनच भारताच्या स्वातंत्र्याची जागरूकता मोहीम चालू ठेवा असे कळवले. अखेर 1946 मध्ये सय्यद भारतात परतलेच. त्यावेळी विजयालक्ष्मी पंडित या उत्तर प्रदेशात मंत्री होत्या.
एम ओ मथाई यांचे लिहीणे खरे मानले तर , सय्यद रोज सकाळी नेहरूंच्या घरी येत. त्यांच्या खिशात नेहमीच cognac ची बाटली असायची व ते सतत सिप घेत असायचे. विजयालक्ष्मी व सय्यद यांच्या भेटीगाठी परत सुरू झाल्या. नेहरूंनी विजयालक्ष्मी यांना रशियात भारताच्या राजदूत म्हणून पाठवले. तर सय्यद यांनाही ईजिप्त देशात राजदूत म्हणून नेमण्यात आले जेणेकरून त्यांच्या भेटी घडू नयेत. लवकरच सय्यद यांचा मृत्यु झाला व त्याबरोबरच या प्रेमकहाणीचा अंतही!
संदर्भ: 1) A forgotten ambassador in Cairo- The life and time of Syad Hussain by N. V. VINOD
2) The scope of Happiness by Vijayalaxmi Pandit
3) Love life of Mrs Pandit by H M Abbas
4) BBC documentary
*
- राजा गायकवाड

आतला दिवा शोधत रहायचा.
प्रकाशाची एक रेघ असतेच आरपार.
प्रकाशाची एक रेघ असतेच आरपार.
ग़ोमंतकीय धर्मगुरुंना आणि लष्करी अधिकार्यांना नेहेमीच सापत्नपणाची वागणूक मिळते, त्यांना डावलले जाते, अशी त्यांची भावना होती. याचीच परिणती 1787 सालच्या पिंटो बंडात झाली, गोव्यातील साम्राज्यवादी पोर्तुगीज सरकारविरोधी स्थानिक लोकांनी केलेला हा दुसरा उठाव होता.
पोतुर्गीज सरकारने हे बंड मोडून काढले. पोर्तुगीज सरकारकडून त्यांच्याविरुध्द कारवाई टाळण्यासाठी ज्युनियर अॅबे फरिया लिस्बनहून फ्रान्सला पळून गेले. त्यानंतर फ्रान्स हीच त्यांची कर्मभूमी बनली.
फ्रान्समध्ये त्यांनी संमोहनशास्त्राचा अभ्यास करुन या कलेचे प्रात्यक्षिक करुन तेथे मोठे नाव कमावले. एक कॅथोलिक धर्मगुरु संमोहनशास्त्राचे समर्थन करतो हे अनेक धर्मगुरुंना आणि चर्चच्या धर्माधिकाऱ्यांना आवडले नाही. संमोहन करणे हे चेटूकगिरी, ब्लॅक मॅजिक आणि सैतानाचे कृत्य आहे असे चर्चमधील त्यांच्या विरोधकांचे म्हणणे होते.
मात्र संमोहन विद्या आणि कॅथोलिक चर्चची शिकवणी परस्परविरोधी नाही असे अॅबे फरिया यांचे म्हणणे होते. संमोहनविद्येत सहभागी होण्यास नकार देणार्या व्यक्तींना संमोहित करणे अशक्यच असते, त्यामुळे संमोहन विद्यामध्ये कुणावरही कसल्याही प्रकारची जबरदस्ती केली जात नाही, असा त्यांचा दावा होता.
असे म्हटले जाते की अॅबे फरिया यांनी आपल्या संमोहनविद्येचे सुमारे 5000 लोकांवर प्रयोग केले आणि या प्रयोगातून त्यांनी अनेक लोकांना त्यांच्या मानसिक रोगांतून बरे केले होते.
अॅबे फरिया यांचे २० सप्टेंबर १८१९ रोजी निधन झाले.
फ्रेंच भाषेत प्रकाशित झालेल्या त्यांच्या या पुस्तकात संमोहन विद्येची अनेक मार्गदर्शक तत्वे त्यांनी मांडली होती. त्यांच्या मृत्युपूर्वी काही दिवस आधी हा ग्रंथ (ऑन द कॉज ऑफ ल्युसिड स्लीप इन द स्टडी ऑफ द नेचर ऑफ मॅन ) प्रकाशित झाला होता. मात्र त्यांच्या मृत्युनंतर एका शतकानंतर अॅबे फरिया यांना आधुनिक संमोहनविद्येचे जनक म्हणून मान्यता मिळाली.
गोव्याचे सुपुत्र असलेल्या अॅबे ’रिया यांच्या जीवनावर किंवा त्यांच्या कार्यावर आधारित बहुतेक सर्व पुस्तके फ्रेंच वा पोर्तुगीज भाषांत आहेत.
अॅबे फरिया यांच्या फ्रेंच भाषेतील महान ग्रंथाचा कोकणी कवी आणि फ्रेंच भाषेतील विद्वान मनोहरराय सरदेसाई यांनी इंग्रजीत अनुवाद केला आहेत.
पणजी येथील अॅबे फरिया यांचा हा पुतळा गोमंतकीय जेष्ठ शिल्पकार रामचंद्र पांडुरंग कामत यांनी घडवलेला आहे. दिनांक 20 सप्टेंबर 1945 रोजी या शिल्पाचे अनावरण झाले. प्रतापगडावरील शिवाजी महाराजांचा कास्य पुतळाही शिल्पकार रामचंद्र पांडुरंग कामत यांचीच कलाकृती आहे.
दक्षिण गोव्यातील मडगाव शहरातील एक महत्त्वाचा रस्ता अॅबे फरिया यांच्या नावाने ओळखला जातो. रुआ अॅबे डी फरिया हे त्या रस्त्याचे नाव. अॅबे फरियांच्या 250 व्या जयंतीनिि’त्त 2006 साली पोर्तुगाल सरकारने गोव्याच्या या सुपुत्राच्या पणजीतील पुतळ्याच्या छायाचित्रावर आधारीत एक खास पोस्टकार्डाचेही अनावरण केले होते.
अॅबे फरिया यांचे फ़्रान्समध्ये निधन झाले आणि त्यांची कबर पॅरिस शहरातील मोन्तमार्त्र परिसरात कुठेतरी आहे असे म्हटले जाते. पॅरिसमधला मोन्तमार्त्र हा परिसर तेथील टेकडीवर असलेल्या भव्य सेक्रेड हार्ट बॅसिलिकासाठी प्रसिध्द आहे.
नोत्र डेम ऑफ पॅरीस या चर्चइतकीच इतकीच सेक्रेड हार्ट बॅसिलिका प्रसिद्ध आहे. अभिजात आणि आधुनिक चित्रकलेचे रसिक असलेल्या लोकांचेही मोन्तमार्त्र हे आवडते स्थळ आहे.
काही वर्षापूर्वी कुटुंबियाबरोबर युरोपच्या सहलीवर असताना पॅरिसमध्ये आमचे मोन्तमार्त्र येथेच एक आठवडाभर वास्तव्य होते.
मोन्तमार्त्रच्या गजबजलेल्या रस्त्यांवर फिरताना, तेथील जमिनीवरील आणि भूमिगत मेट्रोतून प्रवास करताना तेथेच कुठेतरी अॅबे फरिया या गोमंतकीयाच्या चिरसमाधीची जागा असू शकेल असा विचार माझ्या मनात येत असे.
गोव्याच्या या महान सुपुत्राची पॅरीसमधली कबर कदाचित कधीही सापडली जाणार नाही. मात्र संमोहनविद्येच्या क्षेत्रात त्यांनी केलेले योगदान आणि त्यांचा वारसा कधीही विस्मृतीत जाणार नाही.
अँबे फरीयाचा आज स्मृतीदिन
Camil Parkhe September 20, 2024

जोस कस्टडिओचे म्हणजे अॅबे डी फरियाचे वडील कैतानो व्हितोरिनो डी फरिया हे मूळचे बार्देस तालुक्यातीलच कोलवाले या गावचे. सोळाव्या शतकाच्या अखेरीस अनंत शेणई या सारस्वत ब्राह्मणाने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला होता. कैतानो हे या अनंत शेणई यांचे वंशज होते.
अॅबे फरिया यांच्या आईवडिलांची पार्श्वभूमीही वेगळीच होती. त्याचे वडील कैतानो हे ख्रिस्ती धर्मगुरू होण्यासाठी सेमिनरीत शिकत होते. परंतु धर्मगुरुपदाची दीक्षा होण्याआधीच त्यांनी सेमिनरी सोडली. कांदोलीच्या रोझ मारिया डिसोझा या युवतीशी त्यांचे लग्न झाले. या दांपत्याला जोस कस्टडिओ हा मुलगा झाला.
कैतानो आणि रोझ या दोघांमध्ये मात्र कधीही सुसंवाद असा नव्हताच. त्यामुळे हे लग्न फक्त सहा वर्षेच टिकले.त्यानंतर ते दोघे पतिपत्नी परस्पर संमतीने वेगळे झाले.
परस्परापासून वेगळे झाल्यानंतर कैतानो आणि रोझ मारिया डिसोझा या दोघांनीही सन्यासी धार्मिक व्रत स्वीकारण्यासाठी चर्चची परवानगी मिळवली. विवाहीत व्यक्तींना अशाप्रकारे सन्यासी व्रतबंध सहसा दिले जात नाही.
अशाप्रकारे कैतानो यांनी धर्मगुरुपदाचे शिक्षण घेण्यास पुन्हा सुरुवात केली तर रोझा एक नन म्हणजे धर्मभगिनी होण्यासाठी जुन्या गोव्यातील सेंट मोनिका कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला.
सेंट मोनिका कॉन्व्हेंट या मठाची भव्य वास्तू अजूनही अस्तित्वात आणि वापरात आहे.
सन्यासी धर्मगुरुपदाचे शिक्षण घेणारे वडिल आणि मठामध्ये नन असलेली आई यांचा मुलगा म्हणून जोस कस्टडिओला स्थानिक समाजाने कलंकित मानले.
संन्यासी दाम्पत्याचा मुलगा म्हणून त्याला खूप मनस्ताप सहन करावा लागला.
कैतानो फरिया हे अत्त्यंत महत्त्वाकांक्षी होते. आपल्या मुलाची ही परिस्थिती पाहून गोव्यात राहून तो कधीही प्रगती करु शकणार नाही, असे यांना वाटले. त्यामुळे ते आपल्या मुलासोबत 1771 मध्ये गोवा सोडून पोर्तुगालला गेले. तेथे त्यांचा मुलगा जोस कस्टडिओ धर्मगुरु धर्मगुरु होण्यासाठी एक मठात दाखल झाला.
पुढे रोम येथे धार्मिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 12 मार्च 1780 रोजी त्यांचा धर्मगुरु म्हणून दीक्षाविधी झाला.
विशेष म्हणजे रोम येथील विद्यापीठात ईशज्ञान या विषयात डॉक्टरेट मिळविणाऱ्या पहिल्या काही गोमंतकिय धर्मगुरुंमध्ये सिनियर आणि ज्युनियर फरिया यांचा समावेश होता. ज्युनियर अॅबे फरियाने नंतर तत्त्वज्ञान विषयात दुसरी डॉक्टरेट मिळविली. अॅबे फरियाने त्यानंतर आपल्या मायभूमीत कधीही पाऊल ठेवले नाही.
एक उत्तम प्रवचनकार म्हणून अॅबे फरिया प्रसिध्द होते. असे म्हटले जाते की रोम येथील प्रसिध्द सिस्टाईन चॅपलमध्ये पवित्र आत्म्याच्या सणानिमित्त उपदेश करण्यासाठी पोप पायस सहावे यांनी अॅबे फरियांना 1780 साली निमंत्रित केले होते. त्यावेळी ते फक्त 24 वर्षांचे होते.
गोव्यातील ऐतिहासिक राशोल सेमिनरीतील प्राध्यापक फादर आयवो सोझा यांनी लॅटिन भाषेतील या प्रवचनाचे इंग्रजीत भाषांतर केले आहे.
अॅबे फरिया यांच्या जीवनातील एका महत्वपूर्ण धटनेचा त्यांच्या आयुष्यावर फार मोठा प्रभाव पडला. असे म्हणतात कि त्या घटनेने त्यांच्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळाली.
रोमहून लिस्बन येथे परतल्यानंतर पोर्तुगालच्या राणीने आपल्या चॅपेल’ध्ये प्रवचन देण्यासाठी या तरुण धर्मगुरुला निमंत्रित केले. फर्डे वक्ते असलेले अॅबे फरिया प्रवचन देण्यासाठी उंचावर असलेले पुलपीट चढून गेल्यावर बोलण्याआधी त्यांना दरदरुन घाम फुटला.
त्यांचे वडिल त्यावेळी त्या पुलपीठाजवळच मागे उभे होते. आपल्या चिरंजिवाची ती घाबरलेली अवस्था पाहून त्यांनी त्याच्या कानात आपल्या मातृभाषेत म्हणजे कोकणी भाषेत फक्त दोनच वाक्य उच्चारली.
ती वाक्ये ऐकताच ज्युनियर फरियाची भीती पूर्ण गायब झाली. कोकणी भाषेतील त्यांना धीर देणारे ते वाक्य असे होते.
’’पुता, ही सोगली भाजी, कातोर रे भाजी!‘ (अरे बाळा, तुझ्या समोरची ही सगळी आहे पालेभाजी, काप ही सगळी भाजी !‘)
ही दोन वाक्ये ऐकल्यावर आपला आत्मविश्वास कमावल्यावर ज्युनियर अॅबे फरिया यांनी पोर्तुगालची राणी आणि जमलेल्या इतर लोकांसमोर प्रभावी प्रवचन केले.
या छोट्याशा घटनेचा तरुण अॅबे फरियावर खोलवर परीणाम झाला. त्या केवळ एका वाक्यामुळे आपल्या मनातील भीती दूर होऊन या भितीची जागा प्रचंड आत्मविश्वासाने कशी घेतली याचा त्यांना सतत अचंबा वाटत राहिला. यामुळेच पुढे संमोहनशास्त्राबाबत खोलवर संशोधन करण्याचे बीज त्यांच्या मनात रोवले गेले.
सिनियर फरिया आणि ज्युनियर फरिया हे दोघेही 1787 मध्ये गोव्यात घडलेल्या पोर्तुगीज सरकारविरोधी पिंटो बंडात सक्रिय होते. त्याकाळात गोमंतकीय धर्मगुरुंमध्ये आणि स्थानिक लष्करी अधिकार्यांमध्ये पोर्तुगीज सत्तेविरुध्द प्रचंड असंतोष खदखदत होता.

पणजीला आपण जर कधी गेला असाल तर तेथील मांडवी नदीच्या तीरावर असलेला आदिलशाही राजवाडा किंवा जुने सचिवालय तुम्ही नक्कीच पाहिले असेल.
गोव्याची राजधानी पणजी शहराचा हा केंद्रबिंदू. मध्ययुगीन काळातील आदिलशाहाच्या या राजवाड्याच्या दोन्हीही बाजूला दोन पुतळे उभारण्यात आलेले आहेत. या दोन पुतळ्यांपैकी एक पुतळा गोवा, दमण आणि दीवचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा आहे.
राजवाड्याच्या दुसर्या बाजूला असलेला पुतळा कुणाच्याही मनात कुतुहल निर्माण करेल अशा स्थितीत आहे. या पुतळ्यामधे एक झगाधारी मनुष्य आपले दोन्ही हात उभारून एका स्त्रीला संमोहित करण्याचा प्रयत्न करत आहे असे जवळून निरीक्षण केल्यास दिसून येते.
हा पुतळा 18 व्या शतकातील युरोपमधील वैज्ञानिक संमोहनविद्या शास्त्राचे जनक आणि गोव्याचे सुपुत्र अॅबे डी फरिया यांचा आहे.
पणजी बसस्टॅण्डवरून पायी चालत तुम्ही या आदिलशाहाच्या पॅलेसकडून दयानंद बांदोडकर मार्गावरुन मिरामार बिचकडे निघाला कि मांडवीच्या काठावर इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या अनेक वास्तू आणि कलाकृती तुम्हाला दिसतील.
यात कला अकादमीसारख्या वास्तूशास्त्रज्ञ चार्ल्स कोरीयानिर्मित आधुनिक वास्तूची भर पडलेली आहे. पणजीत आल्यावर या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या अॅबे डी फरियाच्या या शिल्पाला भेट द्यायलाच हवी. याचे कारण म्हणजे अॅबे फरिया या व्यक्तिमत्वाचे कर्तृत्व !
1980 च्या दशकात मी पणजीतील दि नवहिंद टाइम्स या स्थानिक इंग्रजी वृत्तपत्रासाठी बातमीदार म्हणून काम करीत होतो. तेंव्हा हा एकमजली कौलारी छत असलेला आदिलशाहाचा राजवाडा तात्कालीन गोवा, दमण आणि दीव या केंंद्रशासित प्रदेशाचे सचिवालय वा मंत्रालय होते.
या मंत्रालयाच्या एका कोपर्यात असलेली एक खोली आम्हा पत्रकारांसाठी एक प्रेस रुम म्हणून दिली होती. आम्हा इंग्रजी दैनिकातील पत्रकारांसाठी एक छोटेसे टेबल आणि टाईपरायटरची सोय होती.
काही दिवसांपूर्वी गोव्यात गेलो तेव्हा कुतुहलाने मुद्दाम या प्रेस रुमकडे वळालो तेव्हा एक सुखद धक्का बसला. या आदिलशाहा राजवाड्यातून गोवा राज्याचे सचिवालयाचे काही वर्षांपूर्वी पोरवोरीम येथे स्थलांतर झाले असले तरी या मध्ययुगीन राजवाड्यातील त्या छोट्याशा खोलीवर आजही प्रेसरुम असा फलक आजही कायम आहे !
तर या आमच्या त्या जुन्या प्रेस रुमच्या अगदी काही फुटांच्या अंतरावर अॅबे फरिया यांचा हा पुतळा आहे. मी गोवा सोडून तीस वर्षे झाली असली तरी या अॅबे फरिया यांच्या या पुतळ्याबाबतचे माझ्या मनातील आकर्षण आजही कमी झालेले नाही. याचे कारण म्हणजे अॅबे फरिया याचे आगळेवेगळे व्यक्तिमत्व.
सन 1961 च्या डिसेंबरमध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी लष्करी कारवाई करुन त्याकाळी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला गोवा,दमण आणि दीव मुक्त केला आणि हा छोटासा प्रदेश भारतसंघराज्याचा भाग बनला.
गोवामुक्तीनंतर गोव्यातील अनेक मोक्याच्या ठिकाणी असलेल्या दर्यावर्दी वास्को द गामा, अफांसो दि अल्बुकेर्क सारख्या पोर्तुगीज गव्हर्नर जनरल आणि व्हॉईसरॉय व इतर अधिकाऱ्यांच्या पुतळ्यांची उचलबांगडी होऊन त्यांची वस्तुसंग्रहालयात रवानगी करण्यात आली.
मात्र पणजीत 1945 साली म्हणजे पोर्तुगीज राजवटीतच उभारण्यात आलेला अॅबे डी फरिया यांचा हा पुतळा या ठिकाणी आजही सन्मानपूर्वक राहिला आहे.
याचे कारण म्हणजे अॅबे डी फरिया यांचे कर्तृत्व युरोपात म्हणजे रोम, पोर्तुगाल आणि फ्रान्स येथे फुलले असले तरी ते गोव्याचेच सुपुत्र आहेत.
दहा फूट उंचीचा अॅबे डी फरिया यांचा हा कांस्य पुतळा पाहून या परिसरात जाणार्या येणार्या लोकांच्या मनात साहजिकच कुतूहल निर्माण होते.
जोस कस्टडिओ फरिया किंवा अॅबे डी फरिया यांचा जन्म गोव्यात बार्देस तालुक्यातील समुद्रकिनार्यावर असलेल्या कांदोळी या गावात 31 मे 1756 मध्ये झाला. या गोमंतकियाने नंतर युरोपात एक कॅथोलिक धर्मगुरु म्हणून नाव कमावले. अॅबोट किंवा मठामध्ये राहणार्या ख्रिस्ती धर्मगुरुस फ्रेंच भाषेत अॅबे म्हणतात.
पॅरीसमध्ये असताना अॅबे डी फरिया यांनी संंमोहनशास्त्रात मॊल्यवान योगदान दिले, संंमोहनशास्त्रावर फ्रेंच भाषेत त्यांनी ग्रंथ लिहिला, गोव्यातील पोर्तुगीज राजवट उलथून टाकण्याचा प्रयत्न करणार्या प्रसिध्द पिंटो उठावातही त्यांचा सहभाग होता, हे विशेष.
अलेक्झांडर ड्युमास याच्या 'द काऊंट ऑफ मोन्त क्रिस्टो' या गाजलेल्या कादंबरीत एका धर्मगुरुचें पात्र अॅबे डी फरिया यांच्यावर बेतलेले आहे. या कादंबरीवर आधारीत काही आणि मूळ कादंबरीइतकेच गाजलेले चित्रपटही आहेत. अॅबे डी फरिया यांच्या व्यक्तिमत्वाने अशाप्रकारे इतिहासकारांना आणि इतरांनाही आकर्षित केलेले आहे.

मागील पानांवरून,
महर्षी शिंदे, वाई आणि तर्कतीर्थ
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे वाई ब्राह्म समाज आणि वाई गावाशी फार जवळचे ऋणानुबंध होते. शिंदे यांच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात सातारा जिल्हा आणि विशेषत वाई हे त्यांचे विसावा ठिकाण होते. वाई ब्राह्म समाजाची शिंदे यांनी उत्तम घडी बसवली. सातारा जिल्ह्यात अनेक प्रचार दौरे केले. अस्पृश्यता निवारणाचे कार्य केले. शिंदे व त्यांचे सहकारी गळयात झेंडूच्या फुलांच्या माळा घालून वारकरी भजने म्हणत नगर संकीर्तने करत. कर्मवीर भाऊराव पाटील देखील शिंदे यांच्या कार्यात सहभागी झाले. त्यांच्या अनेक ठिकाणी सभा झाल्या. वाई सारख्या परंपराशील गावात शिंदे यांनी केलेले सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. जुनी कागदपत्रं पहात असताना एक महत्त्वाचा तपशील पहायला मिळाला. तो असा.
बारा जून १९३४ रोजी महर्षी शिंदे व त्यांच्या भगिनी समाजसुधारक जनाबाई यांनी प्राज्ञ पाठशाळेस भेट दिली होती. तेथून जवळ असणाऱ्या दलित वस्तीची पाहाणी केली होती. तेथील गैरसोयीबद्दल त्यांनी चिंता वाटली होती. विशेषतः पिण्याच्या पाण्याबद्दल त्यांना काळजी वाटत होती. यासाठी ते नगरपालिका अध्यक्षांना भेटणार होते. त्यावेळी ते तरुण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना भेटले होते.
हा वृत्तांत सुबोधपत्रिकेत मिळाला. यात तर्कतीर्थांचा उल्लेख ' विज्ञानरत्न तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ' असा आहे.
रणधीर शिंदे